2377

क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं डोळ्यादेखत चिरडले!

Posted 12 days ago in News and Politics.

2 Views
1 Unique Visitors
क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं डोळ्यादेखत चिरडलं!

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून


भिवंडी, 09 सप्टेंबर : भिवंडी इथल्या वाडा रोडवर दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. दांपत्य दुचाकीवर जात असताना मागून आलेल्या डंपरने जोरात धडक दिल्याने यात पतीचा मृत्यू झाला आहे. पती-पत्नी दोघे दुचाकीवर होते. यामध्ये पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर पतीचा डोळ्यांसमोर मृत्यू झाल्याने महिलेला मोठा धक्का बसला आहे.

या अपघातामध्ये पत्नी जखमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर वाडा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. वारेट इथं खड्ड्यात दुचाकी आदळून खाली पडल्याने पाठीमागून आलेल्या डपंरच्या चाकाखाली गाडी आली. यात डंपरचं चाक पतीच्या अंगावरून गेलं. यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. विजय कृष्णा पाटील (50, रा गणेशपुरी, भिवंडी) असं मयत झालेल्या पतीचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अपघात घडताच स्थानिकांकडून पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दुचाकीला रस्त्याच्या कडेला घेतलं आहे. यात पतीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस सध्या घटनास्थळी अपघाताची चौकशी करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा रोडचं काम पाहणाऱ्या सुप्रिम कंपनीच्या दुर्लक्षामुळे खड्डे पडल्याने रोजच अपघाताच्या घटना होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्त्ता आणि खड्डे आणखी किती लोकांचे जीव घेणार असा प्रश्ना नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

More Related Blogs

Article Picture
shamal deepak yewale 6 hours ago 2 Views
Article Picture
shamal deepak yewale 6 hours ago 0 Views
Article Picture
shamal deepak yewale 2 days ago 3 Views
Article Picture
shamal deepak yewale 2 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 5 days ago 1 Views
Article Picture
shamal deepak yewale 5 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 5 days ago 1 Views
Article Picture
shamal deepak yewale 6 days ago 3 Views
Article Picture
shamal deepak yewale 6 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 6 days ago 1 Views
Article Picture
shamal deepak yewale 9 days ago 1 Views
Article Picture
shamal deepak yewale 9 days ago 0 Views
Article Picture
shamal deepak yewale 11 days ago 12 Views
Article Picture
shamal deepak yewale 12 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 12 days ago 2 Views
Article Picture
shamal deepak yewale 12 days ago 3 Views
Article Picture
shamal deepak yewale 12 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 13 days ago 4 Views
Article Picture
shamal deepak yewale 13 days ago 1 Views
Article Picture
shamal deepak yewale 2 months ago 3 Views
Article Picture
shamal deepak yewale 3 months ago 7 Views
Back To Top