इतिहासातील या सर्वात क्रूर महिला सिरीयल किलरने तब्बल ६५० मुलींच्या रक्ताने स्नान केले होते!

इतिहासातील या सर्वात क्रूर महिला सिरीयल किलरने तब्बल ६५० मुलींच्या रक्ताने स्नान केले होते!

Posted 2 months ago in Other.

User Image
belhekar nikhil
1 Friends
2 Views
3 Unique Visitors
आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक सिरीयल किलर बद्दल ऐकलं असेल, पण आज आपण अशा एका सिरीयल किलर बद्दल जाणून घेणार आहोत जी पंधराव्या शतकातील सर्वात घातक सिरीयल किलर म्हणून प्रसिद्ध आहे. ती म्हणजे एलिझाबेथ, पंधराव्या शतकातील एक स्त्री जिला संपूर्ण शहर घाबरत असे काय कारण होते?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये तुम्हाला सापडतील…..

एलिझाबेथ जगातील सर्वात भयानक स्त्री सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते. एलिजाबेथ बद्दल असं म्हटलं जातं की ती “स्टोकर ड्रॅक्युला” जो एक दानव म्हणून प्रसिद्ध होता, त्याच्याकडून प्रेरणा घेत असे.

असं म्हटलं जातं की एलिझाबेथने ६५० मुलींच्या रक्ताने आंघोळ केलेली होती. ज्या तिच्याकडे काम करत असत.

तिच्या गावातील सर्व नागरिक तिला खूपच घाबरत असत, शहरातील पालक त्यांच्या मुलींना एलिझाबेत समोर येऊ देत नसत कारण त्यांना भीती होती की एलिजाबेथ त्यांच्या मुलींना त्यांच्यापासून दूर करेल.


तिच्याबद्दल शहरांमध्ये भयभीत करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असत. या अफवांमुळे तिला अनेक नाव पडली होती. तिला “रक्त पिणारी” असेही म्हणत असत.

 

www.mnn.com

पश्चिमात्य इतिहासामध्ये तिला एलिझाबेथ म्हणून जरी ओळखले जात असेल तरी तिचे खरे नाव एलिजाबेथ बोथरी असे होते.

तिचा जन्म पंधराशे साठ रोजी हंगेरीतील एका शक्तिशाली कुटुंबामध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव बॅरोन जॉर्ज बोथरी होते. असे म्हणतात की एलिझाबेथ लहानपणापासूनच रागीट स्वभावाची होती तिला लहानपणापासूनच कधी राग सहन होत नसे. ती कधीकधी स्वतःवरील मानसिक ताबा गमावत असे.

बाल अवस्थेतच तिने तिच्या कुटुंबातर्फे देण्यात आलेल्या शिक्षा अत्यंत निर्दयीपणे अंमलबजावणी करताना बघितले होते.

एलिझाबेथ चा साखरपुडा लहानपणीच केलेला होता. ती वयाच्या 12 व्या वर्षापासूनच तिच्या सासरी राहायला गेलेली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं लग्न करण्यात आल, ज्यावेळी तिचं लग्न झालं त्यावेळी तिचा नवरा 20 वर्षांचा होता.

तिचा नवरा एक सैन्यातील सैनिक होता. त्यावेळी हंगेरी ऑटोमन फोर्सेस सोबत युद्ध करण्यात मश्गुल होते. त्याकाळी ऑटोमन सैन्य पूर्ण युरोपला भयभीत करून सोडत असे.

लग्नानंतर ती तेथील एक प्रतिष्ठित स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्या जोडीला “हँर्ष मास्टर” असे म्हटले जाऊ लागले. तिच्या नवर्याने तिला भरपूर अधिकार देऊन ठेवलेले होते. तिच्या नवऱ्याने गुलामांना शिक्षा देण्याच्या अनेक पद्धती तिला शिकवल्या होत्या.

पुढील दहा वर्षाच्या कालावधी मध्ये तिला 4 अपत्य झाली. ज्यात तीन मुली आणि एक मुलगा होता.

 

movingtides.org

जेव्हा ती एखाद्या गुलामाला शिक्षा द्यायची त्या वेळी नवरा तिला प्रोत्साहन देत असे.

त्यानंतर काही काळाने तिचा नवरा तिला तेथील सर्व अधिकार प्रदान करून युद्धावरती निघून गेला. तिथे तिच्या अधिकाराखाली एक किल्ला होता युद्धाच्या काळामध्ये तिने काही वर्ष समाजसेवाही चालू केली होती.

ती युद्धकैद्यांच्या पत्नींना भेटून युद्ध कैद्यांसाठी काही होत आहे का याचा मागोवा घेत असे.

ती तेथील स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी लढण्यास शिकवत असे. त्यांच्या अधिकारांसाठी लढण्यात एलिझाबेथ पुढे असे, पण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला तिचा नवरा युद्धावरून वापस आला.

त्याचे दोन्ही पाय निकामी झालेले होते आणि त्याला एका असाध्य रोगाने पछाडले होते, म्हणून काही काळामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू होईपर्यंत सर्व काही ठीक होते.

पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र एलिझाबेथ स्वतःवरील ताबा ढळला आणि असं म्हटलं जातं की त्यानंतरच तिच्यातील खरी राक्षसी शक्ती बाहेर आली.

 

elizabeth.com

तिने त्यानंतर इतरांना त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या काही दास्या तिला गुलामांना अशा प्रकारे त्रास देण्यात मदत करत असत.

अस म्हटलं जातं की एकदा तिची दासी तिचे केस नीट करून देत होती. त्यावेळी चुकून तिच्या दासीने तिचे केस जास्त जोरात ओढले. या गोष्टीचा एलिजाबेथ खूप त्रास झाला आणि तिने त्या मुलीला परत खूप जोरात मारले.

तिने त्या मुलीला एवढ्या जोरात मारले की तिच्या मुखातून रक्त निघू लागले, ते रक्त तिच्या हातावरती राहिले आणि रात्री तिला असे जाणवले की ज्या भागावरती त्या मुलीचे रक्त राहिले होते तो भाग जास्त उजळ झालेला आहे.

यामुळे एलिझाबेथला एक कल्पना सुचली की तरुण मुलींच्या रक्तामुळे ती अजून तरुण राहू शकते. येथूनच तिच्यातील वेडसरपणाची झलक प्रत्येकाला दिसू लागली.

ती अनेक तरुण मुलींच्या रक्ताने स्नान करायला लागली. त्यानंतर मात्र त्या गावातून सुंदर आणि तरुण मुली गायब होण्याचे जणू सत्रच चालू झाले.

 

medium.com

काही मुले तिच्याकडे काम करण्यासाठी म्हणून येत असत पण ज्या मुली तिच्या वाड्यावरती काम करण्यासाठी गेल्या त्या परत कधी वाड्याच्या बाहेर आल्याच नाहीत असे म्हटले जाते.

जेव्हा त्या मुली किल्ल्यावरती येत असत त्या वेळी त्यांना एका खोलीमध्ये बंद करून त्रास दिला जात असे. एलिजाबेथ स्वतः त्यांना त्रास देत असे.

ती त्यांना मरेपर्यंत मारत राहत असे, बऱ्याच वेळेस ती त्या मुलीच तोंड दोऱ्याने शिवत असे. मग तिचे मांस खात असे.

जेव्हा ती आजारी असेल तेव्हा ती तिच्या नोकरांना सांगत असे की कुठल्या मुलीला मारायचे आहे. असेच काही प्रकारे ती त्यात तरुण मुलींना मारत असे. काही मात्र दिवसांनी तिला तरुण मुलींचा तुटवडा जाणवू लागला.

कारण, एक तर गावातील काही मुलींना तिने आधीच मारून टाकले होते आणि ज्या राहिल्या होत्या त्यांना त्यांचे पालक कधीही तिच्या समोर येऊ देत नसत, लपवून ठेवत असत.

अशा वेळेस एलिजाबेथने काही शाही खानदानातील मुलींना पळवून आणण्यास सुरुवात केली. त्यांना मारण्यास सुरुवात केली १६०९ मध्ये तिने असेच एका शाही खानदानातील मुलीला मारून टाकले. त्यानंतर मात्र त्या भागातील सरकारने या सगळ्या प्रकारावरती लक्ष देण्याचे ठरवले.

 

inmarathi.com

एका रात्री तेथील सर्व अधिकाऱ्यांनी तिच्या किल्ल्यावरती झडती घेतली. मग तिथे या किल्ल्यावर ती त्या अधिकार्‍यांना अनेक युवतींचे मृतदेह सापडले.

शेवटी तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिच्या काही नोकरांना तेथील सरकारने तुरुंगात डांबले आणि तिला नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे तिच्या नोकरांना मृत्युदंडाची शिक्षा झाली पण एलिजाबेथला मात्र आयुष्यभर नजर कैदेतच ठेवण्याचा निर्णय झाला.

ती त्यानंतर तीन साडेतीन वर्षांनी मृत्यू पावली पण मृत्यू नंतरही अनेक वर्षे तिच्याबद्दल जनमानसामध्ये भीतीचं वातावरण होत.

आज ती इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते.
Tags: Vijay fagre,

More Related Blogs

Back To Top